Maharashtra Politics: नाशिक पदवीधर मतदार संघाच्या ( Nashik Graduate Constituency Election ) निवडणुकीत धक्कादायक ट्विस्ट आला आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र, त्यानंत त्यांचे सुपूत्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज  दाखल केला (Maharashtra Political News). सत्यजित तांबे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगलेय. त्यातच आता सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबेंचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. सुधीर तांबें यांच्यावर काँग्रेसपक्षाने निलंबनाची कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज न भरल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.  चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे पक्षातून निलंबित राहतील त्यांच्या निलंबनाचे पत्रक काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहे. राष्ट्रीय शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 


सुधीर तांबे यांनी अर्ज भरलाच नाही


काँग्रेस पक्षानं डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा उमेदवारी दिली. मात्र, त्यांनी अर्ज भरलाच नाही. त्यांच्याऐवजी सुपुत्र सत्यजित तांबे अपक्ष म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघातून उभे राहिले. सत्यजित तांबेंना उमेदवार केल्यानं थोरात विरुद्ध तांबे असा मामा-भाच्यांचा गृहकलह सुरू झाला आहे. 


थोरातांनी अडवला तांबेचा भाजप प्रवेश


भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याला थोरातांनी फोनवरुन सत्यजित तांबेंना तिकिट न देण्याची विनंती केली. हा आमचा कौटुंबिक मुद्दा आहे, तो कुटुंबातच सोडवतो ही भूमिका त्यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला फोनवरुन सांगितली. यानंतर सत्यजित तांबेंचा भाजप प्रवेश थांबवण्यात थोरातांनीच महत्त्वाची भूमिका बजावल्याचं आता स्पष्ट होत आहे. मात्र, अधीच थोरात यांनी अजित पवाराच्या इशाऱ्याकडे लक्ष देऊन तांबे यांच्याशी चर्चा केली असती तर आता हे चित्र निर्माण झाले नसते. 


भाजपची जबरदस्त खेळी


नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अखेर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. त्यांनी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याने त्यांची उमेदवारी अपक्ष जाहीर करण्यात आलीय. विशेष म्हणजे आज राबवण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेत भाजपच्या चार उमेदवारांनी अर्ज भरूनही त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही, हे समोर आलंय. त्यामुळे या खेळीमागे भाजपची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची चर्चा सध्या नगर जिल्ह्यात रंगली आहे. 


अजित पवारांनी आधीच केलं होत काँग्रेसला सावध


सत्यजित तांबेंबाबत अजित पवारांना आधीच कल्पना होती.  'सत्यजित तांबेंबाबत मी थोरातांना आधीच सांगितलं होतं असे अजित पवार म्हणाले. अर्ज भरण्याच्या आदल्या रात्रीच साधव केल्याचे अजित पवारांनी सांगितले.  थोरातांनी अजित पवारांकडे दुर्लक्ष का केलं? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.