मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून आज संविधान बचाव रॅली काढण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत ही रॅली असणार आहे. 


राजू शेट्टींचा भाजपवर हल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलंय...त्याचबरोबर भाजपला अचानक संविधान सन्मान आणि तिरंगा बचाव रॅली काढावी लागली...याचाच अर्थ चोराच्या मनात चांदणं.. त्यांच्या मनात कुठे तरी पाप आहे आणि ते झाकण्यासाठी भाजपला हा केविलवाना प्रयत्न करावा लागत असल्याचं राजू शेट्टींनी म्हंटलंय.


कोण होणार सहभागी?


यात राजू शेट्टी यांच्यासह, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, जनता दलचे नेते शरद यादव, माकपचे सीताराम येचुरी, लोक भारतीचे कपिल पाटील, गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल, गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी, कन्हैया कुमार आदी सहभागी होणार आहेत. ही संविधान बचाव रॅली मंत्रालयाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन गेट वे ऑफ इंडियावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ संपणार आहे.


भाजपचीही रॅली...


याशिवाय विरोधक आणि भाजपा प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारची रॅली काढणार आहे. विरोधकांच्या मुंबईतील संविधान बचाव रॅलीची सांगता गेट वे ऑफ इंडियावर होणार असली तरी पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडियाने या यात्रेला परवानगी नाकारली आहे. या ठिकाणी मुशायऱ्याचा कार्यक्रम असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आलंय. मात्र तरीही गेट वे ऑफ इंडियावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करणारच अशी भूमिका विरोधकांनी घेतलीय. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी मुंबईत विरोधकांविरुद्ध भाजपा असा संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.