मुंबई : एसबीआयच्या (State Bank Of India) खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. अनेक खातेधारक एटीएम, चेक आणि कॅश या तिन्ही माध्यामातून व्यवहार करतात. पण जर तुम्ही चेकद्वारे पेमेंट करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चेकद्वारे पेमेंट केल्याने तुमच्या खात्यावर परिणाम करु शकते. यामुळे तुमच्या खात्यावर चेकचं ओझं वाढू शकतं. (SBI bank account  holders  Pay checks to everyone Then check these rules once)    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसबीआय खातेधारकांना दर आर्थिक वर्षासाठी ठराविक चेक देते. देण्यात आलेले चेक संपल्यानंतर बॅंक अतिरिक्त चेकसाठी शुल्क आकारते. एसबीआय इतर बँकांच्या तुलनेत सर्वात कमी चेक देते. बॅंकेने दिलेले चेक संपल्यानंतर अधिक चेकसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील. या निमित्ताने एसबीआय खातेधारकांना किती चेक मोफत मिळतात, तर किती चेकसाठी किती पैसे मोजावे लागतात, याबाबत जाणून घेणार आहोत.  


बँकेकडून किती चेक मिळतात? 


बँक खातेधारकांना एका वर्षासाठी 10 चेक देते. खातेधारकाने हे 10 चेक संपवल्यानंतर अतिरिक्त रक्कम मोजून चेकबूक घ्यावे लागते. खातेधारकाला अतिरिक्त 10 पानी चेकबूकसाठी 40 रुपये अधिक जीएसटी द्यावे लागतात. तर 40 चेकसाठी 75 रुपये अधिक जीएसटी आकारला जातो. त्यामुळे खातेधारकांना फार आवश्यक असेल तेव्हाच चेकचा वापर करावा. अन्यथा तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजून चेकबूक घ्यावे लागेल. 



संबंधित बातम्या :


Lic च्या 'या' पॉलिसीत 800 रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 लाखांचा परतावा, इतरही फायदे


हे साधंसुधं क्रेडिट कार्ड नाही, जितके जास्त पैसे खर्च करणार तितके परत मिळणार.... काय आहे योजना?