चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambarnath) विद्यार्थ्यांना (Student) घेऊन जाणारी स्कूल बस (School bus) उलटल्याची धक्कादायक घटना घडली. अंबरनाथ पूर्वेच्या ग्रीन सिटी संकुलात घडलेला हा अपघात सीसीटीव्हीत (CCTV) कैद झालाय. अंबरनाथच्या रोटरी शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक खासगी मिनी स्कूल बस (School bus) सोमवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेण्यासाठी ग्रीन सिटी संकुलात आली. रिव्हरवूड इमारतीसमोरील उतारावर या बसचालकाने बस रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला असता बसवरील (School bus) चालकाचं नियंत्रण सुटून बस मागे आली आणि उलटली. (school bus carrying students overturned in Ambernath) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी ताक्ताळ बसवर चढून सगळ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. या घटनेत दोन विद्यार्थ्यांना किरकोळ स्वरूपाची इजा झाली असून इतर विद्यार्थी सुखरुप आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीये. दरम्यान, रोटरी शाळा व्यवस्थापनानं ही बस शाळेची नसून शाळेचा बससोबत कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. ही बस खासगी असून पालक त्यांच्या सोयीनुसार या बसने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत असल्याचं शाळा व्यवस्थापनानं स्पष्ट केलंय.



तर दुसरीकडे स्थानिक रहिवाशांनी बस मालकविरोधात संताप व्यक्त केलाय. या बसचा इन्शुरन्स नव्हता, तसंच बसची अवस्थाही अतिशय मोडकळीस आलेली होती, त्यामुळे यात बस मालकाचा निष्काळजीपणा असल्याचं सांगत पालकांनी संताप व्यक्त केलाय