मुंबई : ज्येष्ठ विज्ञान लेखक, खगोलाभ्यासक प्रा. मोहन आपटे यांचे निधन झाले. मुंबईत विलेपार्ले इथे पहाटे त्यांचं निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अखेरच्या काळात आजारपणामुळे अंथरुणास खिळेपर्यंत ते कार्यरत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहन आपटे सरांनी ७० हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. विज्ञान विशेषतः खगोलशास्त्र सोप्या भाषेत समजावनून सांगण्यात त्यांची हातोटी होती. त्यांच्या 'मला उत्तर हवंय' ही त्यांची पुस्तकांची श्रुखंला विशेष गाजली. मराठीबरोबरच त्यांनी इंग्रजीतून नऊ पुस्तकांचे लिखाण केले आहे. वैज्ञानिक विषय सोप्या भाषेत समाजावून सांगणारी व्याख्याने आणि प्रदर्शनासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र अक्षरश: पिंजून काढला. अखेरच्या काळात आजारपणामुळे अंथरुणास खिळेपर्यंत ते कार्यरत होते. ते अविवाहित होते.


मोहन आपटे यांचा जन्म कोकणात राजापूरजवळचे कुवेशी गावात झाला. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे शालेय शिक्षण झालं. भौतिकशास्त्रातील पदवी त्यांनी पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात आणि पदव्युत्तर शिक्षण अहमदाबाद विद्यापीठातून पूर्ण केले. भारतीय विद्याभवन सोमाणी महाविद्यालयात त्यांनी १९६६ ते १९९८ या काळात भौतिकशास्त्राचे अध्यापन केले. 


मोहन आपटे निवृत्त होताना महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. तसेच काही काळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुंबई विभागाचे मोहन आपटे अध्यक्ष होते.