नवी दिल्ली: देशभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणादरम्यान कोरोना लसीबद्दल (Corona Vaccine) चांगली बातमी समोर आली आहे. ड्रग रेग्युलेटरच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी (SEC)ने भारत बायोटेकच्या कोरोना व्हॅक्सीनच्या(Covaxin) चाचणीत भाग घेतलेल्या स्वयंसेवकांना तिसऱ्या डोसची परवानगी दिली आहे. हैदराबादस्थित कंपनीने दोन डोसनंतर तिसर्‍या म्हणजे बूस्टर डोसच्या चाचणीसाठी औषध नियामककडे प्रस्ताव पाठविला होता.


6 महिन्यात तिसरा डोस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विषय तज्ञ समिती (SEC)च्या मंजुरीनंतर कोवाक्सिनचा तिसरा डोस मिळणार आहे. बूस्टर डोस दिल्यानंतर 6 महिन्यानंतर कोवॅक्सीन (Covaxin)चा तिसरा डोस दिला जाईल. भारत बायोटेक वॉलिंटीयर्स स्वयंसेवकांच्या आरोग्याची माहिती घेते. त्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होण्यास आणि वाढविण्यात किती मदत होते हे पाहीलं जाणार आहे.



कोव्हॅक्सिनचा तिसरा डोस लागू झाल्यानंतर कोरोना विषाणूविरूद्ध शरीराची प्रतिकारशक्ती बर्‍याच वर्षांपर्यंत वाढेल असा प्रस्ताव भारत बायोटेकने सरकारला दिला. यासोबत कोविड 19 च्या नव्या रूपापासून संरक्षण मिळेल. यानंतर एक्सपर्ट पॅनेलने (SEC)बूस्टर डोसला परवानगी दिली आहे.


9 राज्यात शाळा बंद 


देशभर कोरोना केसेस (Corona in India) पुन्हा वाढत असल्याचं समोर आले आहे. या पार्श्वभुमीवर देशात ९ राज्यांत शाळा बंद (School Closed) करण्याचा निर्णय घेण्यात आला. बहुतांश राज्यात ८ वी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.  दिल्लीत एकाच दिवशी ५३% केसेस वाढल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गुजरातेत ८ महापालिका क्षेत्रात शाळा बंद आहेत.


दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगाना आणि पुडुचेरी यासारख्या राज्यांत सरकारने पुन्हा शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत. दिल्लीत गुरूवारी एकाच दिवशी २ हजार ७९० केसेस आढळल्या आहेत.