राज्यात दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान
राज्यात सोमवारी दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे.ठाण्यात 41, पालघर 56, रायगड 242, रत्नागिरी 222, सिंधुदुर्ग 325, पुणे 221, सोलापूर 192, सातारा 319, सांगली 453,कोल्हापूर 478, नागपूर 238, वर्धा 112, चंद्रपूर 52, भंडारा 362, गोंदिया 353 आणि गडचिरोली 26 अशा एकू 3,692 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होईल. तर 17 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
मुंबई : राज्यात सोमवारी दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे.ठाण्यात 41, पालघर 56, रायगड 242, रत्नागिरी 222, सिंधुदुर्ग 325, पुणे 221, सोलापूर 192, सातारा 319, सांगली 453,कोल्हापूर 478, नागपूर 238, वर्धा 112, चंद्रपूर 52, भंडारा 362, गोंदिया 353 आणि गडचिरोली 26 अशा एकू 3,692 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होईल. तर 17 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
चंद्रपुरात 52 ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान
चंद्रपूर जिल्ह्यातील 52 ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनानं तयारी पूर्ण केलीय. मतदानासाठी तहसील कार्यालयांमधून कर्मचा-यांना निवडणुकीचे साहित्य वाटप करण्यात आलं. आणि जरुरी सूचना देऊन रवाना करण्यात आलं.
निवडणुकीच्या या कामात जवळपास 700 महसूल विभागाचे आणि 500 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत. यावेळी सरपंच पदासाठी थेट मतदान होणार असल्यामुळे मतदानाची आणि त्यानंतर होणा-या मतमोजणीची उत्सुकता वाढलीय. थेट सरपंच निवडीमुळे राजकीय पक्षांच्या ग्रामीण भागातील ताकदीचा अंदाज यावेळी येईल.