मुंबई : रेल्वे कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलांनादेखील अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने केंद्रीय प्रशासनिक ट्रिब्यूनल (कॅट) चा आदेश लागू करुन ही व्यवस्था सुरू केली आहे. आतापर्यंत पहिली पत्नी जिवंत असताना किंवा घटस्फोट घेतल्याशिवाय दुसर लग्न करणाऱ्यांना यासाठी रेलवेकडून मान्यता नव्हती.त्यामुळे दुसऱ्या पत्नीच्या मुलांनाही नोकरीचा फायदा मिळत नसे.  रेल्वे कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या आपत्यास नोकरी न मिळाल्याच्या देशात साधारण १० हजार केसेस आहेत.


सुप्रीम कोर्टाचे आदेश 


 रेल्वेच्या नियमानुसार पहिली पत्नी जिवंत असताना किंवा घटस्फोट घेतल्याशिवाय दुसऱ्या लग्नातून झालेल्या आपत्यास नोकरी मिळत नव्हती. पहिल्या कॅटने दुसऱ्या पत्नीच्या मुलांना वडिलांच्या स्थानी नोकरीचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सुप्रिम कोर्टात अपील केलं होतं. सुप्रीम कोर्टाने हे अमान्य केलं. पहिली पत्नी असताना दुसऱ्या पत्नीपासून होणारी मुलं नोकरीपासून वंचित राहू नये असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. रेल्वे बोर्डाचे अधिकारी नीरज कुमार यांनी २१ मे ला पत्र जारी करत कॅटचे आदेश लागू करण्याचे आदेश दिले. यासोबतच जानेवारी १९९२ चे परिपत्रक रद्द केले.