दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि झपाट्यानं वाढणारी रुग्णसंख्या पाहता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून मुंबईत पुन्हा एकदा भारतीय दंडसंविधानातील कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. बुधवारी रात्रीपासूनच मुंबईत हे कलम लागू करण्यात येणार असून, परिणामी शहरामध्ये पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१५ जुलै रात्रौ १२ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असेल. यारम्यान पहाटे ५ ते रात्री ९ वाजता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामासाठी बाहेर पडण्याची मुभा असेल. तर, सर्वसामान्य नागरिकांना मात्र आवश्यक कामांसाठी घराबाहेर फक्त २ किलोमीटरपर्यंतच्या अंतरातच प्रवास करता येणार आहे. 


पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी याबाबतचे आदेश जारी केले. ज्याअंतर्गत एक किंवा त्याहून अधिक व्यक्तिंना सार्वजनिक ठिकाणी जमण्यास मज्जाव घालण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त इतरही कोणत्याच ठिकाणी व्यक्तींना एकत्र न जमण्याचे आदेश या कलमाअंतर्गत देण्यात आले आहेत. 



काहीसा नियंत्रणात आललेला कोरोना रुग्णांचा आकडा नागरिकांच्या बेफिकिरीमुळं पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळं नाईलाजानं संचारबंदीचे आदेश पुन्हा देण्यात आले आहेत. त्यामुळं आता किमान पुन्हा एकदा लागू करण्यात आलेली ही संचारबंदी मुंबईकरांना फायद्याची ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.