मुंबई : भीमा-कोरेगाव घटनेला मंगळवारी काही प्रमाणात हिंसक वळण लागल्यानंतर आज भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज अनेक ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच काही भागात याला सुरुवात देखील झाली आहे.


मोठा पोलीस बंदोबस्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घाटकोपरमध्ये रमाबाई कॉलनी आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंगळवारी या महामार्गावर आंदोलकांकडून रस्तारोको झाला होता. त्यामुळे येथे मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.



अफवांवर विश्वास ठेवू नका


राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. भीमा-कोरेगावच्या घटनेबद्दल राग आहे, मात्र जनतेनं संयम बाळगावा असं आवाहनही आंबेडकर यांनी केलं आहे.