मुंबई : देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात फोन टॅपिंग प्रकरण गाजले. या प्रकरणाचा तपास सुरु असून  या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. तत्कालीन भाजपचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते यांना समाजविघातक घटक ठरवून त्यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोन ट्रॅपिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान एसआयडीच्या लेटरमधून ही बाब उघड झालीय. एसआयडीने तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्याकडे केलेल्या अर्जात या नेत्यांचा नंबरावर दुसऱ्याच कोणाचं नाव देण्यात आलं होतं.


हे दोन्ही नंबर समाज कंटकांचे आहेत असा दावा या पत्रात करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना फोन टॅपिंगची परवानगी मिळाली होती. समाजविघातक घटकाच्या नावाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन माजी मंत्री एकनाथ खडसे ( NCP Eknath Khadse ) तसेच शिवसेनेचे संजय राऊत ( Shivsena Sanjay Raut ) यांचा फोन टॅप करण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिलीय.


फोन टॅपिंगची परवानगी मिळाल्यानंतर खडसे यांचा फोन 67 दिवस तर राऊत यांचा फोन 60 दिवस टॅप करण्यात आला होता अशीही माहिती मिळतेय.


दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी ड्रग पेडलर, गुंड वगैरे असल्याचं दाखवून राऊत, खडसे, नाना पटोले यांचे फोन टॅप करण्यात आले असा आरोप केलाय.