मुंबई विमानतळावर तीन कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) डीआरआयने ११०७ ग्राम हेरॉईन (Narcotic Drugs ) जप्त केले आहे.
मुंबई : विमानतळावर (Mumbai Airport) डीआरआयने ११०७ ग्राम हेरॉईन (Narcotic Drugs ) जप्त केले आहे. सौंदर्य प्रसादन म्हणून भारतात काही पार्सल पाठवले होते जे नवी मुंबई (Navi Mumbai) करता पाठवण्यात आले होते. मात्र त्यातून अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहे. या अमली पदार्थ असलेल्या हेरॉईनची किंमत जागतिक बाजार पेठेत अंदाजे तीन कोटी रुपये आहे.
टांझानिया (Tanzania ) देशातून आलेले पार्सल डीआरआयने जप्त केले आहे. एका कांसाईनमेंटमध्ये सौंदर्य प्रसादान साहित्य आले होते. मात्र पार्सलमध्ये हेरॉईन असल्याचं उघड झाले आहे. या साहित्याची तपासणी करत असताना केसाला लावण्यात येणाऱ्या कलर्सच्या पाकिटात केसरी रंगाची पाकीट लपवण्यात आली होती.
ही पाकीट वेगळी करून त्याची तपासणी केली असता त्या पाकिटातील संशयास्पद वस्तूचे हे हेरॉईन असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील पाच आठवड्यात ही तिसरी कारवाई आहे. मात्र हे अमली पदार्थ कोणी पाठवले आणि कोणकडे जाणार होते याचा तपास डीआरआय कारीत आहे.