मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतीदिन. आपल्या दैवताला वंदन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवसैनिक मुंबईतील शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर दाखल होणार आहेत.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह ठाकरे कुटुंबीय बाळासाहेबांना आदरांजली वाहतील. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क इथं येणार आहेत.


यंत्रणा सज्ज 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी काळाच्या पडद्याआड गेले.


आपल्या आक्रमक वकृत्त्व शैलीने त्यांनी तब्बल चार दशकं महाराष्ट्राला वेड लावलं होतं.


मराठी माणसाला एक वेगळी ओळख मिळवून देण्यात बाळासाहेबांचं एक मोठं योगदान आहे.


त्यामुळे त्यांना वंदन करण्यासाठी शिवाजी पार्कवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.


स्मृतीदिनाच्या निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे.