मुंबई : ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे त्यांच्या दादर येथील निवासस्थानी आज सकाळी वृध्दपकाळाने निधन झाले. 16 मे रोजी दिनू रणदिवे यांच्या पत्नीचे निधन झाले होते. आणि एका महिन्याने आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संयुक्त महाराष्ट्र पत्रिके'च्या माध्यमातून सुरु असलेल्या लोकचळवळीत त्यांचा महत्वाचा  सहभाग राहीला. गोवा मुक्ती संग्रामातही त्यांचा सहभाग होता. सामान्य माणसांचे, वंचितांच्या प्रश्नांना त्यांनी नेहमीच वाचा फोडली. बांगलादेश युद्धाचे त्यांनी प्रत्यक्षात जाऊन वार्तांकन केलं होतं. भिवंडी आणि वरळी दंगलीचे भयानक सामाजिक वास्तव त्यांनी समाजापुढे मांडले.



संपूर्ण आयुष्य व्रतस्थ भावनेने पत्रकारिता करणारा, सामाजिक जाणिवा जागृत ठेवून समर्पित भावनेने काम करणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराला आपण आज मुकलो अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भावना व्यक्त केली. 


पत्रकारिता, राजकीय, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रातून दिनू रणदिवे यांना श्रद्धांजली वाहिली जातेय.