मुंबई: विकासदराने गेल्या नऊ वर्षांतील गाठलेला निच्चांक आणि आर्थिक क्षेत्रातील मंदीचे पडसाद मंगळवारी शेअर बाजारात उमटले. त्यामुळे दिवसाअखेर सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक अनुक्रमे ७७० आणि २२५ अंकांनी कोसळले. आज शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स ३६,५६२ तर निफ्टी १०७९७ या पातळीवर होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्याच आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरणाचा निर्णय जाहीर केला होता. केंद्राच्या या निर्णयाला भांडवली बाजारात सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र, आज झालेल्या व्यवहारात इंडियन बँक, पीएनबी, ओबीसी, कॅनरा बँक, युनियन बँक या प्रमुख बँकांचे समभाग तब्बल ९ टक्क्यांनी कोसळले. 


मोदी सरकारच्या सर्वव्यापी गैरव्यवस्थापनामुळे अर्थव्यवस्था संकटात- मनमोहन सिंग


त्यामुळे केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांविषयी भांडवली बाजारात अजूनही साशंक असल्याचे दिसून आले. परिणामी आता सरकारने आणखी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. 


श्रावण-भाद्रपदात अर्थव्यवस्थेत मंदी येतेच; विरोधक उगाच गोंधळ घालतायंत- मोदी