मुंबई : बँक कर्मचाऱ्यांनी २६ आणि २७ सप्टेंबर रोजी पुकारलेला संप अखेर मागे घेण्याची घोषणा केली आहे. सरकारकडून १० बँकांच्या विलिनिकरणाविरोधात बँक युनियननी संपाचे हत्यार उपसले होते. परंतु, बँक कर्मचारी संघटनेचे नेते आणि अर्थसचिव राजीव कुमार यांच्यात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने हा संप मागे घेण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने त्यांच्या विलीनीकरणाच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी या संपाची हाक दिली होती. 


बँक युनियननी इंडियन बँक्स असोसिएशन (IBA)ला विलिनिकरणाविरोधात संप करणार असल्याची नोटीस दिली होती. ३० ऑगस्ट रोजी सरकारने १० बँकांचे ४ बँकांमध्ये विलिनिकरण करणार असल्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट येऊ शकते अशी भीती बँक युनियननी व्यक्त केली होती.