मुंबई : मुंबई पोलिसांनी सोमवारी नालासोपारा भागात एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. धक्कादायक म्हणजे, सोशल मीडियाद्वारे हे सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. मिळालेल्या माहितीनुसार, दलाल सोशल मीडियावर ग्राहकांना महिलांचे फोटो पाठवत असत. त्यानंतर सोशल मीडियावरच त्यांची किंमत आणि जागा ठरवली जात असे... देह व्यापारातील चार पीडित महिलांनी समोर येऊन पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी घटनास्थळी धाड घातल्यानंतर चार पीडित महिलांसोबत त्यांना एक दलाल महिलाही हाती लागलीय. याच महिलेच्या इशाऱ्यावर अनेक तरुणींना देह व्यापारात जबरदस्तीनं आणलं जात असे.


स्थानिक एस पी गौरव सिंह यांना सोशल मीडियावर सेक्स रॅकेट सुरू असल्याची सूचना मिळाली होती. त्यानंतर एसपींनी महिला पोलिसांची एक संयुक्त टीम गठीत करून छापा घालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पोलिसांनी सोशल मीडियाद्वारेच महिला दलालाशी संपर्क करत बनावट ग्राहक पाठवला. 


त्यानंतर दलाल महिला चार महिलांसोबत बनावट ग्राहकासमोर आली. त्याचवेळी पोलिसांनी छापा घातल चार पीडित महिलांसोबत दलाल महिलेला संतोष भवन लॉजमध्ये अटक केली. 


या प्रकरणात आणखी कुणाचा समावेश आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे टोळकं व्हॉटसअपवर विवाहीत आणि अविवाहीत महिलांचे फोट शेअर करून त्यांची किंमत ठरवत असत. त्यानंतर ग्राहक एखाद्या लॉजमध्ये महिलांना भेटण्यासाठी जात असत.