मुंबई : वसईच्या (Vasai) उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेटचा (Sex racket) पर्दाफाश करण्यात आला आहे. एनजीओच्या नावाखाली हे सेक्स रॅकेट चालवले जायचे. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाल्यानंतर रात्रीच्या वेळी एक बनावट ग्राहकाला पाठवून या सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात यश आले. कारवाईदरम्यान  दोन पीडितांची सुटका करण्यात आली. वसईत सेक्स रॅकेट सुरु असल्याची जोरदार चर्चा होती. एनजीओच्या नावाखाली काही महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघड झाले आहे. 



कृष्णा टाऊनशीप या उच्चभ्रू परिसरात ही घटना घडल्याचे उघड झाले आहे. सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेला पोलिसांकडून अटक करण्यात आली, अशी माहिती मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे अनैतिक मानवी वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी दिली.