मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या घरी दिवाळीनिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत मन्नत इथल्या आयोजित या पार्टीला गालबोट लागलंय. यावेळी शाहरूख खानच्या भेटीसाठी एक फॅन कोलकाता इथून आला होता. मोहम्मद सलीम नावाच्या या शाहरूखच्या फॅनने स्वतःवर ब्लेडने हल्ला करून जखमी केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शाहरुखची भेट न झाल्याने तो हताश झाला होता. त्यामुळे त्याने हा हल्ला केल्याचं बोललं जातंय. पोलिसांनी या फॅनला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. शाहरूखच्या घरी आयोजित या दिवाळी पार्टीला बॉलिवूडच्या दिग्गज तारे-तारकांनी हजेरी लावली. मात्र या फॅनच्या स्वतःवरील हल्ल्याने या पार्टीला गालबोट लागलं.