शिवसेनेचा राष्ट्रवादीला दणका, शहापूरचे आमदार करणार सेनेत प्रवेश
राष्ट्रवादीचे आमदार बरोरा यांनी आमदारकीचा राजीनामा देत शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
ठाणे : शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधान भवनात अध्यक्षांकडे सोपविला आहे. यावेळी त्यांच्यासोबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे होते. बरोबरा हे राजीनामा देऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहे. हा राष्ट्रवादीसाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे.
पांडुरंग बरोरा यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपविला आहे. यावेळी शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधान भवनात त्यांनी अध्यक्षांकडे राजीनामा दिला. आता पांडुरंग बरोरा लवकरच शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शहापूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.