मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सहजच काही वक्तव्य करत नसतात, पण जेव्हा वक्तव्य करतात तेव्हा ते चिमटा घेण्यासारखं असतं, एवढंच नाही तर पुढील दिशा सांगणारं असतं, असंच भाजपला चिमटा घेणारं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. यापूर्वी शरद पवार यांनी लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांची ज्या घटनेत हत्या झाली, त्या घटनेची तुलना जालियनवाला बागच्या घटनेशी केली आणि टायमिंग साधण्याचा प्रयत्न केला आहे.


निकटवर्तीयांवर जेव्हा इनकम टॅक्सच्या धाडी पडल्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या कार्यालयांवर जेव्हा इनकम टॅक्सच्या धाडी पडल्या त्या नंतर शरद पवार यांनी, परत केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे, आणि ११ ऑक्टोबर रोजी लखीमपूर येथे झालेल्या शेतकरी हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.


भाजपला खड्यासारखं सत्तेपासून दूर ठेवता येईल


आता यावरच पवार थांबलेले नाहीत, तर नुकत्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांना चांगलं यश मिळालं. हे न विसरता, महाविकास आघाडीच्या पक्षांनी यापुढे देखील एकत्र निवडणूक लढवावी, म्हणजे भाजपला खड्यासारखं सत्तेपासून दूर ठेवता येईल, अशी कला पवारांनी आपल्या वक्तव्यातून सांगितली.


वक्तव्य फक्त वक्तव्य म्हणून घेतली नाही तर


आता शरद पवारांचं हे वक्तव्य म्हणजे फक्तच वक्तव्य म्हणून घेता येणार नाही. तर जर भाजपाने सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तर किंवा भविष्यातही आपण सर्व महाविकास आघाडीचे पक्ष निवडणुकीतही भाजपासमोर संघर्षाला एकत्र राहू, हा संदेश असू शकतो.