मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयुष्यातील सर्वात प्रिय गोष्ट सोडल्याची चर्चा आहे. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव आहे. राजकारणात त्यांचं मोठं वजन असलं तरी शरद पवारांनी आपलं शारीरिक वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी ते केलं देखील आहे. शरद पवार यांनी तब्बल १४ किलो वजन कमी केलं आहे. पण त्यांनी कुठल्याही डॉएट एक्सपर्टची यासाठी मदत घेतली नाही. त्यांनी स्वतःच डाएट ठरवत ६ महिन्यांत वजन कमी केलं आहे. कॅन्सर सारख्या रोगाचाही पराभव करणारे शरद पवार यांना काहीच अशक्य नाही असं म्हटलं जातं. शरद पवार यांना तसं नॉनव्हेज जेवण फारच आवडतं. पण वजन कमी करण्यासाठी मात्र त्यांनी यावर पाणी सोडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवारांनी ६ महिन्यांपूर्वी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. ज्यासाठी त्यांनी आपली प्रिय गोष्ट नॉनव्हेज खाणं सोडलं. वैद्यकीय गोष्टीमुळे त्यांना मासे खावे लागतात. पण जेवणात फक्त एकच पोळी ते खातात. त्यांच्या या डाएटमुळे त्यांचं वजन १४ किलोंनी कमी झालं असून आता आणखी फ्रेश वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


एकीकडे लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असताना सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. पण काम करत असताना शरीराची काळजी घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. हे शरद पवार यांच्याकडे पाहून आता अनेक नेत्यांना लक्षात आलं असेल. त्यामुळे आगामी काळात शरद पवारांच्या प्रचारसभा आणखी वाढल्या तर नवल वाटायला नको.