मुंबई : राजधानी मुंबईत निघालेल्या मराठा मोर्चाला शुभेच्छा देत असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. तसेच, मराठा समाजाच्या सर्वसमावेशक प्रश्नाकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहील, अशी आपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या फेसबुक पेचज्या माध्यमातून शरद पवार यांनी मराठा मोर्चाला शुभेच्छा दिल्या आहेत.  या शुभेच्छा देत असताना पवार म्हणता, 'हाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने तरुण-तरुणी या मोर्चात सहभागी झालेले आहेत. या मोर्च्याच्या माध्यमातून राजर्षि शाहू महाराजांनी मांडलेली मराठा समाजाच्या हिताची संकल्पना व त्याबरोबरच अन्य अठरापगड गोरगरीब जाती-जमातीच्या प्रश्नालाही सकल मराठा विचारांची साथ राहील, ही महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे.'


दरम्यान, मराठा मोर्चाबाबत आपले विचार व्यक्त करतान पवार यांनी सरकारकडूनही आपेक्षा व्यक्त केली आहे. 'मराठा समाजाच्या सर्वसमावेशक प्रश्नाकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहील व नव्या पिढीच्या आशा-आकांक्षा पूर्ततेसाठी योग्य ती पाउले टाकली जातील, अशी माझी राज्य सरकारकडून अपेक्षा आहे', असे पवार यांनी म्हटले आहे.


दरम्यान, मराठा समाजाच्या क्रांती मोर्चास सुरूवात होऊ आता काही तास उलटले आहे. त्यामुळे मोर्चाने आता गर्दीचा एक उच्चांक गाठला असून, अद्यापही राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोंढेच्या लोंढे मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईवर धडकत आहेत.