मुंबई : शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीसाठी लीलावती रूग्णालयात पोहोचले आहेत. शरद पवार यांची संजय राऊत यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. छगन भुजबळ देखील लीलावती रूग्णालयात पोहोचले आहेत. दुसरीकडे अजित पवार यांनी म्हटलं आहे, शिवसेनेशिवाय सत्तास्थापन करणं कुणालाही शक्य नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत हे काल छातीत दुखत असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी त्यांनी ट्वीट केलं आहे, 'लहरो से डरकर नौका पार नही होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती.'


काँग्रेसनेते दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. तर आज रात्री साडेआठपर्यंत सत्तास्थापन करण्याची वेळ राष्ट्रवादीला राज्यपालांनी दिली आहे, राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही, तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.