शहापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र अव्हाड यांनी गावरान जेवनाचा आस्वाद घेतला आहे. शुक्रवारी शहापूर दौऱ्यावर असताना आदिवासी पाड्यावर दोघांनी जेवनाचा आस्वाद घेतला आहे. भगवान सांबरे रूग्णालय संचलित हेमंत सुपर कर्करोग स्पेशलिस्ट रुग्णालयाचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांनी दोऱ्याचा पाडा येथील रामचंद्र खोडके यांच्या घरी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी जेवन केले. या कार्यक्रमादरम्यान आदिवासी नृत्य देखील सादर करण्यात आले. तेव्हा हे सादरीकरण शरद पवार यांनी त्यांच्या फोनमध्ये चित्रीत केलं आहे. 



तर, जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून त्यांचा आणि शरद पवारांचा जेवताना फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये 'या नेत्याला काय म्हणावे. कुडाची झोपडी.. आदिवासी मावशीने केलेला स्वयंपाक..तांदळाची भाकरी.. भाजलेल्या कोंबड्याचा रस्सा..कनटोरल्याची भाजी..आणि साहेब जेवता आहेत.' असं लिहिलं आहे. 


शिवाय, जेवनाचा आस्वाद घेताना त्यांनी आदिवासी कुटुंबाच्या समस्या देखील जाणून घतल्या. ठाणे-मुंबईपासून काहीच अंतरावर असलेल्या पाड्यात सोयी-सुविधांचा आभाव असल्याचं सांगत या रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील जनतेला त्यांना परवडेल अशा खर्चात उपचार होतील असं शरद पवार म्हणाले.