मुंबई : ( Sharad Pawar ) शरद पवार यांच्या सिल्वर ओक ( Silver Oak ) बंगल्यावर शुक्रवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक घेराव घातला. यातील काही आंदोलकांनी पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. या घटनेला जबाबदार धरून वकील गुणरत्न सदावर्ते ( Gunratna Sadarvarte ) यांच्यासह १०६ आंदोलकांना पोलिसांनी अटक केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटक करण्यात आलेल्या या आंदोलकांना काल न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर, वकील गुणरत्न सदावर्ते यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


दरम्यान, या घटनेच्या अधिक चौकशीसाठी पोलिसांच्या कोठडीत असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना गावदेवी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले आहे. त्यांची अधिक चौकशी सुरु आहे. पोलीस उप आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी सदावर्ते यांची चौकशी करत असल्याचे समजते.