मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाच चर्चेचा विषय ठरत असलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीविषयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मौन सोडले. संजय राऊत यांनी शरद पवारांची घेतलेली ही मुलाखत म्हणजे मॅचफिक्सिंग असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच ही मॅरेथॉन मुलाखत संपली की मी या सगळ्यावर प्रतिक्रिया देईन, असेही फडणवीस यांनी म्हटले. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस या सगळ्यावर काय भाष्य करणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधी पक्ष डिझास्टर टूरिझममध्ये व्यस्त; आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला


तसेच फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचाही समाचार घेतला. कोणीही सरकार पाडण्याच्या प्रयत्नात नाही. संजय राऊत यांचा हा दावा म्हणजे एकप्रकारचा कांगावा आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी राऊत हे सगळे करत असल्याच आरोप फडणवीस यांनी केला.

संजय राऊत यांनी नुकतीच 'सामना' दैनिकासाठी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले होते. ''मी पुन्हा येईन' ही लोकांना गृहित धरण्याची वृत्ती देवेंद्र फडणवीस यांना नडली. तसेच शिवसेना नसती तर भाजपचे १०५ आमदार निवडून आलेच नसते, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. 

'नया है वह’: फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना सणसणीत टोला
कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील विरोधी पक्ष डिझास्टर टुरिझममध्ये व्यग्र असल्याची टीका करणारे राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सणसणती टोला लगावला. 'नया है वह', असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य यांची खिल्ली उडविली. तसेच मुख्यमंत्री योग्य वाटेल त्यांना मंत्री करू शकतात. पण केवळ मंत्री झाल्याने शहाणपण येत नाही, अशी बोचरी टीकाही यावेळी फडणवीस यांनी केला.