मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पूरस्थिती आणि मदतकार्याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या बैठकीला पवारांसोबत सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित होते. पुरामुळे उसाचं फार मोठं नुकसान झालंय. ऊस पाण्यात बुडाला होता. त्यामुळे ऊस कुजण्याची शक्यता आहे. सरकारनं कर्जमाफीची मर्यादा वाढवून १ लाखापर्यंत करण्याची मागणी पवारांनी या बैठकीत केली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा सांगली कोल्हापूरसह कोकण आणि पालघर जिल्ह्यात देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी उपाययोजना करण्यात यावी असंही पवारांनी सूचवले.



यावेळी पवार यांनी सांगितले, कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मी जाहीर पत्रकार परिषद आयोजित करून पूरग्रस्त भागातील बाधीत जनतेच्या मागण्यांकडे राज्यसरकारचे लक्ष वेधले. त्यास अनुसरून राज्यसरकारने काल मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काही धोरणात्मक निर्णय घेतल्याचे दिसून येते. मी केलेल्या जाहीर मागण्यांची दखल घेऊन राज्यसरकारने मंत्रीमंडळ उपसमिती बैठकीत हा विषय प्राधान्याने घेतला. मात्र काही मागण्या आंशिक स्वरूपात मान्य झाल्या असून त्यात त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळे पीडित जनतेने मांडलेल्या व्यथा व केलेल्या मागण्या या निवेदनाद्वारे विस्ताराने मांडल्या.