मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर आज शरद पवार दुपारी २ वाजता ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. ईडी कार्यालयात जाण्याआधी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडी कार्यालयाच्या परिसरात  कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे त्या परिसरातील वाहतुकीला व सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. पोलीस प्रशासन व इतर सर्व सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करावे, असं ट्विट पवारांनी केलं आहे.




दरम्यान शरद पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवारांच्या ईडी ऑफिस भेटीच्या पार्श्वभूमीवर परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पवारांच्या ईडी कार्यालय भेटीकडे गृह मंत्रालयाची नजर आहे. पवारांच्या ईडी भेटीसंदर्भात दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत परिस्थिती चिघळली तर सीआरपीएफ जवानांना तैनात राहण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच पोलीस बंदोबस्त वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात.