Presidential Election 2022 : शरद पवार राष्ट्रपती होणार का? संजय राऊत, पवार पाहा काय म्हणाले...
Presidential Election 2022 : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव सत्ताधारी भाजप राष्ट्रपतीपदासाठी कायम करेल अशी शक्यता सूतराम नाही, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुंबई : Presidential Election 2022 : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव सत्ताधारी भाजप राष्ट्रपतीपदासाठी कायम करेल अशी शक्यता सूतराम नाही, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांकडे मनाचा मोठेपणा नाही, असा टोला राऊत यांनी यावेळी हाणला.
राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांचं नाव चर्चेत, मात्र...
राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाली आणि या पदासाठी कोणाची वर्णी लागणार याचीच मोठी उत्सुकता आहे. सत्ताधारी भाजपकडून अद्याप नावे जाहीर झालेली नाही. मात्र, विरोधी पक्षातील नेते शरद पवार यांचे नाव अचानक चर्तेत आले. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली होती. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पवार यांना पाठिंबा असेल, अशी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे पवार यांचे नाव चर्चेत आले. (Signs Of Sharad Pawar As Opposition Choice For President)
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय स्तरावर अशा घडामोडी सुरु असताना स्वत: शरद पवार हे राष्ट्रपती पदासाठी इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे.
'मी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसून या निवडणुकीत उमेदवार होणार नाही, असे शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे. पवार यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे विरोधी पक्षामध्ये होत असलेल्या चर्चेबाबत आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.