मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केली. या पोस्टमुळे केतकी चांगलीच ट्रोल झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते यांनी तिचा निषेध केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी तर तिच्या आई वडिलांचे संस्कार कमी पडले. तिला चार / पाच फटके मारले पाहिजे असे विधान केले. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पात्र पाठवून तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे.


राज्यात असे वातावरण असताना शरद पवार यांनी केतकी चितळे हिच्या पोस्टवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कोण केतकी चितळे? ती मला माहित नाही. तीन कोणती पोस्ट केली ते ही मला माहित नाही. आणि ज्या गोष्टी मला माहित नाही त्यावर माहिती नसताना मी भाष्य करणार नाही, असे सांगत पवार यांनी केतकी चितळे हिच्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.