मुंबई :  शरद पवार यांनी २० मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय जाहीर केला होता, यावेळी सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावर ते काँग्रेसमधून बाहेर पडले होते. वेगळा पक्ष जाहीर करण्याची घोषणा करताना शरद पवार पत्रकार परिषदेत २१ वर्षापूर्वी म्हणाले होते, आमचा पक्ष ''सोनिया काँग्रेस'' आणि ''भाजपा''शी सारख अंतर ठेवणार आहे. सोनिया गांधी या विदेशी असल्याच्या मु्द्यावर शरद पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आणि बंद दाराआड चर्चेची चर्चा


 शरद पवार यांच्या भाषणातील आजचे मुद्दे :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला २२ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. सध्या राष्ट्रवादी राज्यात शिवसेना आणि काँग्रेससह सत्तेत आहे. सध्या चर्चेचा विषय हा आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बंद दाराआड ३० मिनिटं चर्चा झाली. 


या प्रश्नावर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी बोलताना म्हटलं आहे, मुख्यमंत्री पंतप्रधानांना वेगळे भेटले त्याबाबत चर्चा  सुरू झाल्या, पण त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.  शिवसेनेसोबत एकत्र काम करू असं कधीही वाटलं नव्हतं; पण आपण पर्याय दिला आणि लोकांनी त्याचं स्वागत केलं, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.


पवार म्हणतात, तेव्हा देखील शिवसेना काँग्रेसच्या पाठीशी


यावेळी बोलताना त्यांनी इतिहासातील एका घटनेची आठवण करून दिली. शरद पवार म्हणाले की, 'महाराष्ट्रात शिवसेनेला मी गेली अनेक वर्ष पाहात आहे. काँग्रेसला पाठिंबा देणारा शिवसेना हा फार पूर्वीपासूनचा एकमेव पक्ष आहे. मी असं म्हणायचं कारण की ज्यावेळी जनता पक्षाचे राज्य आले आणि काँग्रेसचा पराभव झाला तेव्हा शिवसेना काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली. 


 पवार म्हणतात, शिवसेनेचा हा इतिहास विसरता येणार नाही 


'शिवसेनेनं इंदिरा गांधींना पुढच्या निवडणुका न लढवण्याचं वचन दिलं आणि ते शेवटपर्यंत पाळलंही. शिवसेनेनं त्यावेळी ठाम भूमिका घेतली होती. हा इतिहास विसरता येणार नाही.'