मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकासआघाडीची स्थापना कशी झाली? आपण शिवसेनेसोबत का आणि कसे गेलो? याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी शरद पवारांची ही मुलाखत घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवारांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीवर आरपीआयचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्याबद्दल मला आदर आहे, पण राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत जाऊन राष्ट्रवादीला फायदा नाही. त्यांनी नरेंद्र मोदींसोबत आलं पाहिजे. शरद पवार एनडीएसोबत आले, तर एनडीएला एक अनुभवी नेता मिळेल. देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी पवारांनी एनडीएसोबत यावं, असं आवाहनही आठवलेंनी केलं आहे.


विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत युती केली म्हणून त्यांच्या १०५ जागा निवडून आल्या, अन्यथा भाजपला ४०-५० जागांवरच समाधान मानावं लागलं असतं, असं शरद पवार म्हणाले. तसंच राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारला अजिबात धोका नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.