महाविकास आघाडीत चौथ्या जागेचा तिढा; राज्यसभेच्या जागेसाठी जुगलबंदी
राज्यसभा निवडणुकीसाठी आज केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानभवनात जाऊन अर्ज दाखल केला.
मुंबई : राज्यसभेच्या चौथ्या जागेवरून महाविकास आघाडीतील तिढा कायम आहे. त्यामुळे आज केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच विधानभवनात जाऊन अर्ज दाखल केला. राज्यातील ७ जागांपैकी ४ जागी महाविकास आघाडीचा विजय होऊ शकतो. यातील २ जागांवर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. फौजिया खान यांचं नावही निश्चित झालं आहे.
मात्र काँग्रेस चौथ्या जागेवरचा दावा सोडायला तयार नाही. आता आघाडी समन्वय समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आज केवळ पवारांनी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, जयंत पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे बहुतांश मंत्री आणि आमदार होते.
२६ मार्च रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी १३ मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.