Sharad Pawar Resigns Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरुन निवृत्तीची  घोषणा केल्यानंतर राज्यातील राजकरमा ढवळून निघाले आहे. त्याच्यात आता शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या चर्चत मोठा ट्वीस्ट आला आहे. शरद पवार हेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहणार असल्याची माहिची सुत्रांकडून मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनाला बसले आहेत. कार्यकर्ते आणि नेत्यांचा आग्रह लक्षात घेऊन शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्यासंदर्भात फेरविचार करत असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच आता मोठी अपडेट समोर आली आहे. शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहणार असून  संघटनेच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांना नियुक्त करण्याचा विचार संघटनेत सुरु असल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळाली आहे. 


शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकी पर्यंत अध्यक्ष पदावर कायम  राहावे या आग्रही  भूमिकेमुळे संघटनात्मक बदल इतर पातळींवर करावे असा मतप्रवाह असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. त्यानुसारच काही बदल केले जाणार आहेत. 
राजीनामा मागे घेण्याचे पवारांचे संकेत


शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याची संकेत दिले आहेत. वाय बी चव्हाण सेंटरबाहेर गेल्या तीन दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या कार्यकर्त्यांची समजूत घालताना पवारांनी संकत दिले.  पुढील एक-दोन दिवसांत निवृत्तीबाबत निर्णय घेताना कार्यकर्त्यांची भावना दुर्लक्षित होणार नाही, असं आश्वासन शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिलंय. तसंच अशा प्रकारे आंदोलनाला  बसावं लागणार नसल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं.  5 मे रोजी सकाळी 11  वाजता एनसीपी कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत  संघटनेच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांना नियुक्त करण्याबाबत प्रफुल पटेल यावेळेस प्रस्ताव मांडतील आणि इतर नेते अनुमोदन देतील अशी माहिती सूत्रांने दिली.