झी मराठी दिशा : शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा
`झी समूहा`च्या वतीनं प्रकाशित करण्यात आलेल्या `झी मराठी दिशा` या नव्या आठवडापत्राला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खास शुभेच्छा दिल्यात.
मुंबई : 'झी समूहा'च्या वतीनं प्रकाशित करण्यात आलेल्या 'झी मराठी दिशा' या नव्या आठवडापत्राला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खास शुभेच्छा दिल्यात.
'झी समूहा'च्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या या नव्या आठवडापत्राचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायंकाळी समारंभपूर्वक झालं. एस्सेल समूहाचे शिल्पकार आणि मार्गदर्शक, राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदी मान्यवर या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. हे नवे आठवडापत्र महाराष्ट्राला दिशा देणारं ठरेल, अशा शब्दांत सर्वच मान्यवरांनी झी मराठी दिशाला खास शुभेच्छा दिल्या.