मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आहे. या आरोपानंतर विरोधी पक्ष भाजपकडून (BJP) जोरदार टीका करण्यात आली. तसेच मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली. मात्र, राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची पाठराखण करण्यात आली आहे. आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत कोणतेही पाऊल उचलणार नाही, असे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले. आता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. धनंजय मुंडें यांच्यावरील आरोपांवर विश्वास नाही, असे सांगत मुंडे दोषी आढळल्यास कारवाईची जबाबदारी आमची, असे म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा (Renu Sharma) हिच्यावर तिघांनी आरोप केले तर दोघांनी तिच्याविरोधात तक्रार दिली आहे. आता ही बाब पोलिसात गेली आहे. संपूर्ण पोलीस चौकशीनंतर (police inquiry) काय तो निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादीच्या बैठकीत ठरले आहे, अशी माहिती  शरद पवार (Sharad Pawar) याआधी दिली होती. त्यामुळे तूर्तास धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला होता. आता पुन्हा एकदा पवार यांनी मोठे वक्तव्य करत आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी दोषी असल्यास कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत.  


धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील आरोपानंतर राजकारणात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, या प्रकरणाला वेगळे वळण लागल्यानंतर पवार यांनीही सावध भूमिका घेतली होती. एका महिलेने आरोप केल्यानंतर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची चौकशी पोलीस संपूर्ण चौकशी करतील, असे ते म्हणाले.


तसेच धनंजय मुंडे हे मला स्वत: भेटले. यावेळी त्यांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती मला दिली, असे शरद पवारांनी यावेळी सांगितले. तसेच तक्रारीचे स्वरुप गंभीर आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर त्या महिलेले तक्रार दाखल केल्यानंतर वेगळीच माहीती मीडियाच्यामाध्यमातून पुढे आली आहे. त्यामुळे आता पोलीस चौकशी करतील. त्यानंतर पुढील पाऊल उचलेल जाईल, असे स्पष्ट संकेत पवार यांनी दिले होते.