मुंबई : Sharad Pawar Health Issue: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मंगळवारी उशिरा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी पित्ताशयामध्ये अडकलेला दगड यशस्वीरीत्या बाहेर काढला, ही माहिती  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि ऑपरेशन करणार्‍या डॉक्टरांनी दिली.


डॉक्टरांच्या देखरेखीखाली शरद पवार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि डॉक्टर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, 'राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले. आता काही दिवस ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतील. या क्षणी, त्याची प्रकृती स्थिर आहे. यासह, डॉक्टरांनी सांगितले की जर भविष्यात त्यांना  या ऑपरेशनपासून आराम मिळाला नाही तर भविष्यात पित्ताशयाची स्थितीपाहून शस्त्रक्रिया करावी लागू शकते.


 एक दिवस आधीच ऑपरेशन केले


 शरद पवार(Sharad Pawar) यांना  29 मार्च रोजी पोटदुखीनंतर ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर पित्ताशयामध्ये समस्या उघडकीस आली. यानंतर, डॉक्टरांनी 31 मार्च रोजी ऑपरेशनसाठी वेळ दिला होता, परंतु मंगळवारी पोटदुखी सुरु झाल्याने त्यांना निर्धारित ऑपरेशनच्या एक दिवस आधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी रात्री उशिरा त्यांच्यावर ऑपरेशन केले.


शरद पवार यांची प्रकृती (Sharad Pawar Health) रविवारी बिघडली. त्यानंतर त्यांना ब्रीज कँडी रुग्णालयात नेण्यात आले. पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यानंतर पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत पवारांना पित्ताशयाचे निदान झाले आहे. पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समजल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत अनेकांकडून विचारपूस करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फोनवरुन चौकशी केली. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनीही प्रकृतीबाबत चौकशी केली. त्यानंतर शरद पवार यांनी ट्विट करत मोदींसह सर्वांचेच आभार मानले.