नवी दिल्ली :  Sanjay Raut on Sharad Pawar : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भेट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी घेतली. यानंतर राऊत यांनी रोखठोक मत मांडले. राहुल गांधी यांनी पुढाकार घेतला याचा अर्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे लहान होत नाही.  ते ज्येष्ठ नेते आहेत. काल मी पवार यांच्याशी चर्चा केली आहे. शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशाच्या राजकारणात नाही, असे मत राऊत यांनी मांडले. (Sanjay Raut met Rahul Gandhi, a big reaction on Sharad Pawar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील घडामोडींवर राहुल गांधी अनेकदा माझ्याकडून माहिती घेत असतात. मी प्रथमच प्रियंका गांधी यांना भेटत आहे. या भेटीबाबत शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्व माहिती दिली जाईल. उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. आघाडीच्या कामाची पद्धतीवर राहुल गांधी यांनी समाधान व्यक्त केले आहे. पवार साहेबांना या गाठीभेटीवर काही शंका नाही. याबाबत काल मी पवारांशी चर्चा केली आहे. 



यावेळी संजय राऊत म्हणाले, मी शिवसैनिक आहे. मी हे सूचनेनुसार आणि आदेशानुसारच करत असतो. ज्या घडामोडींमध्ये आम्ही सहभागी होत असतो त्याची माहिती पक्षप्रमुखांना देत असतो.


युपीएत सहभागी होण्यासंबंधी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले, उद्धव ठाकरे योग्य वेळी आपले म्हणणे मांडतील. त्यात लपवण्यासारखे काही नाही. आम्ही महाराष्ट्रात काँग्रेससोबत सरकार चालवत आहोत. आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि लहान घटक सहभागी आहेत. ही महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्रातील मिनी युपीए आहे, असे संजय राऊत म्हणाले.