20 रुपयांचा शेअर पोहोचला 596! 3 वर्षात गुंतवणूकदारांना मिळवून दिला 26 लाखांचा निव्वळ नफा
This Share Goes From 20 Rs To 596 Rs: शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना थोडा संयम बाळगला तर चांगला परतावा मिळू शकतो हे अनेकदा सिद्ध झालं आहे. असाच काहीसा प्रकार एका कंपनीसंदर्भात अवघ्या 3 वर्षांमध्ये घडला आहे. या कंपनीमध्ये हजारो गुंतवणारे आज लखपती झालेत.
This Share Goes From 20 Rs To 596 Rs: शेअर बाजारामधील गुंतवणूकीमध्ये जोखीम असली तरी विचारपूर्वक गुंतवणूक करणाऱ्यांना या माध्यमातून चांगली कमाई करता येते असं अनेक उदाहरणांमधून दिसून आलं आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स असे असतात जे अल्पावधीमध्ये गुंतवणूकदारांना चांगले रिटर्नस देतात. तर काही शेअर्ससंदर्भात संयमी भूमिका घेत गुंतवणूक केल्यास ते अपेक्षेपेक्षाही अधिक रिटर्नस देतात. अशाच एका कंपनीने तिच्या गुंतवणूकदारांना अगदी मालामाल केलं आहे. या कंपनीच्या शेअरने 20 रुपयांवरुन 596 रुपयांपर्यंत मजल मारली आहे.
कोणत्या कंपनीचा शेअर?
20 रुपयांवरुन 570 पर्यंत मजल मारलेल्या या शेअरचं नाव आहे, ऑर्किड फार्मा (Orchid Pharma)! औषध निर्मिती क्षेत्रातील या कंपनीच्या शेअर्सच्या दरांमध्ये मागील 3 वर्षांमध्ये 2600 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीमध्येच या शेअरने 20 रुपयांपासून 596 रुपयांपर्यंत मजल मारली आहे.
3 दिवसांमध्ये 26 रुपयांनी वाढला दर
मागील आठवड्यातील कामकाज 4 ऑगस्ट रोजी बंद झालं तेव्हा ऑर्किड फार्माच्या शेअर्समध्ये 0.15 टक्क्यांची वाढ होती. हा शेअर शुक्रवारी कामकाज संपलं तेव्हा 570 वर बंद झाला. सोमवारी हाच आकडा 596 रुपये म्हणजेच विकेण्डला या शेअरची किंमत 26 रुपयांनी वाढली. कंपनीच्या शेअरच्या वाढीवर नजर टाकल्यास मागील 3 वर्षांमध्ये या शेअरने कमालीची कामगिरी केली आहे. 3 वर्षांपूर्वी म्हणजेच 6 नोव्हेंबर 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर ऑर्किड फार्माच्या शेअरची किंमत 20.83 रुपये इतकी होती. 3 वर्षांमध्ये या शेअरची किंमत 570 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच ही वाढ टक्केवारीमध्ये 2600 इतकी आहे.
26 लाखांचा निव्वळ नफा
मागील आठवड्यातील आकडेवारीनुसार म्हणजेच शेअर्सचा दर 570 आहे असा विचार करुन अगदी सोपी आकडेमोड सांगायची झाल्यास एखाद्याने 3 वर्षांपूर्वी ऑर्किड फार्मामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला 26 लाखांचा नफा झाला आहे. 2020 मध्ये 1 लाखांचे शेअर्स घेऊन त्या शेअर्सला मागील 3 वर्षांमध्ये हात लावला नसेल तर आज त्यांची किंमत 27 लाख इतकी आहे. म्हणजेच 3 वर्षांमध्ये 26 लाखांचा निव्वळ नफा या गुंतवणूकदाराला झाला असं म्हणता.
कशी आहे या शेअरची कामगिरी?
ऑर्किड फार्माचा शेअर सोमवारी म्हणजेच 7 ऑगस्ट रोजी 596.70 रुपयांवर बंद झाला. या शेअर्सच्या किंमतीमध्ये या आठवड्यामध्येच 4.09 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील महिन्याभरामध्ये या शेअर्सची किंमत 13 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 6 महिन्यांचा विचार केला तर या शेअर्सची किंमत 56 टक्क्यांनी वाढली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतची सरासरी वाढ ही 54 टक्के इतकी आहे. एका वर्षात या शेअरनं गुंतवणुकदारांना 80 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत.
(Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती स्टॉक्स ब्रोकरेजकडील आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.)