VIDEO : दीर्घकाळानंतर पाहायला मिळाला मुख्यमंत्र्यांचा शायराना अंदाज
`माझ्यावर टीकेची करून कामना... विखे पाटील वाचतात सामना...`
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर कविता आणि शेरोशायरीतून निशाणा साधला. कवितेतून त्यांनी आगामी निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युतीचा दाखलाही दिला... पाहूया मुख्यमंत्री काय म्हणालेत...
हा व्हिडिओ खुद्द मुख्यमंत्र्यांनीचा आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलाय. 'माझ्यावर टीकेची करून कामना... विखे पाटील वाचतात सामना...' अशा ओळीही त्यांनी यावेळी या व्हिडिओसोबत लिहिल्यात.
राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाची शुक्रवारी सांगता झाली. अधिवेशनाचे जेमतेम शेवटचे दोन दिवस दोन्ही सभागृहात कामकाज झालेलं पाहायला मिळालं. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारा कायदा या अधिवेशनात मंजूर झाला, हीच काय ती या अधिवेशनाची एकमेव आणि मुख्य घडामोड ठरली. बऱ्याच वर्षांनी मुंबईत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात टी-वन वाघिणीची हत्या प्रकरण, राज्यातील अघोषित भारनियमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, उत्तर महाराष्ट्र-मराठवाडा पाणी वाटप वाद आणि अर्थात दुष्काळाचा विषय असे मुद्दे गाजतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मराठा आरक्षण याच एकमेव मुद्याभोवती हे अधिवेशन फिरत राहिले. त्या तुलनेत गंभीर असा दुष्काळाचा मुद्दा थेट शेवटी चर्चेसाठी आला. एकूण आठ दिवस प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस निश्चित करण्यात आले असले तरी गोंधळामुळे फारसं कामकाज झालं नाही.