मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : शीना बोरा ( Seena Bora ) हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला ( Indrani Mukharji ) दोन लाखांचा जामीन मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. जामीन व्यक्ती देण्यासाठी ती सातत्याने कोर्टाकडे वेळ मागत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकेकाळी करोडो रुपयांची मालकीण असलेल्या इंद्राणीकडे पैसा आहे. पण जामीन म्हणून उभे राहणारे लोक तिच्याकडे नाहीत. त्यामुळेच इंद्राणी मुखर्जी जामीनपत्र भरण्यासाठी न्यायालयाकडे सतत वेळ मागत आहे.


इंद्राणी मुखर्जी हिची वकील सना रईस खान ( Adv. Sana Khan ) यांनी सीबीआय न्यायालयाकडे आठ आठवड्यांचा वेळ मागितला होता. पण, न्यायालयाने हा वेळ खूप जास्त असल्याचे सांगत चार आठवड्यांचा वेळ दिला.


वकील सना खान यांनी इंद्राणी मुखर्जी हीच मोबाईल जप्त करण्यात आला. ती 6.5 वर्षे तुरुंगात होती त्यामुळे लोकांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळेच न्यायालयाने वेळ वाढून द्यावी अशी विनंती केली होती.


सर्वोच्च न्यायालयाने ( Suprime Court )  इंद्राणी मुखर्जीला 18 मे रोजी जामीन मंजूर केला. विशेष सीबीआय न्यायालय ( Spl. CBO Court ) रजेवर असल्याने 18 मे रोजी प्रभारी न्यायालयाने इंद्राणीला जामिनावर सोडण्यासाठीच्या अटी निश्चित केल्या होत्या.


इंद्राणीला स्थानिक सॉल्व्हेंटकडे 2 लाख रुपयांचा बॉण्डही भरण्याचे आदेश दिले होते. यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. 19 मे रोजी सुरू झाला होता आणि 1 जून रोजी संपला आहे.


अंतिम मुदत 1 जून रोजी संपली


विशेष सीबीआय न्यायाधीश एस. पी. नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, दोन आठवड्यांची मुदत 1 जून रोजी संपली आहे आणि इंद्राणीने पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे. इंद्राणीचे वकील सना रईस खान यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला की ते सध्या जामीनपत्र भरण्यास असमर्थ आहेत.


बॉण्ड भरण्यास आणखी वेळ लागेल. त्यामुळे वकील सना यांनी 8 आठवड्यांचा वेळ मागितला. मात्र, सरकारी वकील अभिनव कृष्णा यांनी या अर्जावर पुरेसा वेळ आधीच देण्यात आला आहे. मुदतवाढीसाठी कोणतेही योग्य कारण दिलेले नाही, त्यामुळे अर्ज फेटाळण्यात यावा, असा जोरदार आक्षेप घेतला.


दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश नाईक निंबाळकर यांनी 'परिस्थिती लक्षात घेऊन इंद्राणीला आणखी वेळ देत आहोत. मात्र 8 आठवडे थोडे जास्त आहेत, म्हणून चार आठवड्यांचा वेळ देत आहोत', असे सांगितले.