मुंबई : शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिलाय. शिवसेना (Shivsena) मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता बदलला. शिंदे गटाकडून जारी करण्यात आलेल्या एका नियुक्ती पत्रावर शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय म्हणून, थेट ठाण्याच्या टेंभी नाका येथील आनंदआश्रमचा (Anand Ashram) पत्ता देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे नवं मध्यवर्ती कार्यालय
यापूर्वी, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय म्हणून दादर इथल्या शिवसेना भवनाचा (Shivsena Bhavan) उल्लेख केला जात होता. शिंदे गटाने (Shinde Group) आता यशवंत जाधव (Yashwant Jadhav) याची मुंबईच्या विभागप्रमुख पदावर नियुक्ती केली आहे. यासंदर्भात, त्यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रावर नव्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा, म्हणजेच टेंभी नाका इथल्या आनंदआश्रमचा पत्ता देण्यात आला आहे. हे कार्यालय 24 तास खुलं राहणार आहे.


आंनदआश्रमाचा डागडुजी सुरु करण्यात आली असून काही दिवसात उद्घाटन करण्यात येणार आहे. 


एकनाथ शिंदे गटाकडून दसरा मेळावाही हायजॅक?
उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गट यांच्यात आणखी एका विषयावरुन रस्सीखेच सुरू झालीय. निमित्त आहे ते शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील (Dasra Melwa) दसरा मेळाव्याचं. यंदाचा दसरा मेळावा कोण आयोजित करणार, यावरून वादाची नवी ठिणगी पेटलीय. 


पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्तानं शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झालीय. मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असताना, महापालिकेने मात्र हात आखडता घेतल्याचे समजतंय. त्यामुळे आता विचारांचे सोने लुटण्याची संधी शिवसेनेला मिळणार, की एकनाथ शिंदे गटाला याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.