मुंबई : Maharashtra Governor's Controversial Statement : राज्यपालांच्या वक्तव्यावरुन शिंदे गटानेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशी विधाने राज्यपालांकडून येऊ नयेत, अशा सूचना राज्यपालांना देण्यात याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्राकडे करणार आहेत. याआधीही राज्यपालांनी महापुरूषांबाबत वादग्रस्त विधान केलं होते. राज्यपालांचं विधान हे दोन समाजात फूट पाडण्यासारखं विधान आहे, असं राज्यपालांनी म्हटले आहे. घटनात्मक पदावरील व्यक्तीने अशी विधानं करू नयेत, असं शिंदेगटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. मात्र राजीनामा मागणार का या प्रश्नाला मात्र केसरकर यांनी बगल दिली. मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते मुंबईत येऊ देत, त्यानंतर बोलू असे सांगत विषय टाळला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यपाल भगतसिंह कोश्यारी करत आहेत असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. राज्यपालांची तक्रार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वाट न पाहता ट्वीटरवरून आत्ताच्या आत्ता पंतप्रधानांकडे पत्र लिहून तक्रार करावी असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 


राज्यपालांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी काय ट्विट केले आहे. महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण  मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा, अशी मागणी मटकरी यांनी केली आहे.


मनसेचे संदीप देशपांडे यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. महाराष्ट्राचा अपमान कदापी सहन करणार नाही, पदाचा आदर, पण राज्यपालांनी काहीही बोलू नये असा इशारा संदीप देशपांडेंनी दिला आहे.