shiv Sena Symbol Row LIVE :  संपूण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाण  (Shiv Sena Symbol) निवडणुक आयोगासमोर सुनावणी  (Election Commission India) होत आहे. शिंदे गट हा राजकीय पक्ष नाही असा दावा ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी केला आहे.  लोकशाहीनुसार म्हणणं मांडायला हवं होतं, गुवाहाटीला का गेले? असा सवालही कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी झालेल्या सुनावणीत उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख नाहीत असा खळबळजनक युक्तीवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला होता.  यानंतर आता ठाकरे गटाच्या वकिलांनी त्यांच्या या युक्तीवादावर पलटवार केला आहे. 
शिवसेना पक्षात फूट म्हणता येणार नाही. शिंदे यांनी लोकशाहीनुसार म्हणणं मांडायला हवं होते. मात्र, ते गुवाहाटीला निघून गेले. पक्षाने बोलावलेल्या सभेत शिंदे गट उपस्थित नव्हता. यामुळे  शिंदे गट हा राजकीय पक्ष नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.


प्रतिनिधी सभा, राष्ट्रीय कार्यकारिणीची सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगात केलेली आहे. पण, शिंदे गटाने ती केलेली नाही. त्यामुळे शिंदे गट राजकीय पक्ष नाही.शिंदे गटाने निवडणूक आयोगात कोणतीही पूर्तता केलेली नाही. त्यामुळे शिंदे गट स्वत:ला राजकीय पक्ष म्हणत असेल तरी शिंदे गट राजकीय पक्ष नाही, जोरदार युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. 


ठाकरे गटाकडून दोन अर्ज दाखल झाले.  प्रतिनिधी सभा तसेच नेता निवडीसाठी अर्ज दाखल केले. राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्यासोबत आहे. पक्षप्रमुख निवड राष्ट्रीय कार्यकारिणीत होऊ शकते. प्रतिस्पर्धी गट असल्याचा पुरावा शिंदे गटाकडे नाही. ठाकरेंची कार्यकारिणी ही घटनेप्रमाणं आहे. यामुळे ठाकरे गट कार्यकारिणी बरखास्त होऊ शकत नाही.  शिंदेंची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर असून एकनाथ शिंदेंची निवड देखील बेकायदेशीर असल्याचा दावा सिब्बल यांनी केला. 


राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्यावी किंवा किंवा निवडणुका घेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी देखील कपिल सिब्बल यांनी केली.  शिंदे गटाची प्रतिज्ञापत्रं तपासून घ्या. 61 पैकी 28 जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्रं नाहीत.  शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा देखील सिब्बल यांनी केला.


शिंदेचा 'तो' व्हिडिओ  निवडणूक आयोगापुढं सादर करणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याचा दाखला ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगापुढं सादर केला जाण्याची शक्यता आहे. आम्ही मोदींचेच असल्याचं शिंदेंनी डावोसमध्ये सांगितलं होतं. बीकेसीतल्या भाषणात शिंदेंनी तसा उल्लेख केला होता. या भाषणाची व्हिडिओ क्लिप निवडणूक आयोगापुढं पुरावा म्हणून सादर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, 2019 साली उद्धव ठाकरेंनीही आम्ही मोदींचेच आहोत, असं अनेकदा सांगितलं होतं. तेव्हा पक्ष विसर्जित केला होता का, असा उलटसवाल मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलाय.