Eknath Shinde Group : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गुरुवारी मंत्रालयात प्रवेश करताना संतोष बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मंत्रालयाच्या गार्डन गेटमधून कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यावरुन हा वाद सुरु झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यकर्त्यांची नोंद न घेता थेट प्रवेश द्यावा या मागणीसाठी बांगर आग्रही होते. तेव्हा पोलिसांनी कार्यकर्त्यांना नियमाप्रमाणे जाऊ न दिल्यानं बांगर संतापले आणि त्यांनी शिवीगाळ घालत पोलिसांसोबत हुज्जत घातली. हा वाद सोडवण्यासाठी अखेर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली. याआधीसुद्धा बांगर सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणं, शिवीगाळ करणे यावरुन वादात अडकलेत.


शिंदे गटाचे संतोष बांगर यांनी यापूर्वी हिंगोलीमध्ये कामगार विभागाच्यावतीने चालवल्या जाणाऱ्या उपहारगृहात राडा घातला होता. उपहारगृहाच्या व्यवस्थापकाला त्यांनी कानशिलात ठेवून दिली होती. त्यानंतर पीक विमा कंपनीच्या कार्यालयात त्यांनी तोडफोड केली.  एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे आणि वादामुळे संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.


आज संतोष बांगर मंत्रालयात जात होते. त्यांच्यासोबत दहा-पंधरा कार्यकर्ते होते. मात्र तेथील पोलिसांना त्यांना रोखले आणि त्यांना पास घ्या असे सांगितले. अनेकांकडे पास नसल्याने कार्यकर्त्यांना पोलिसांनी आत सोडले नाही. यावेळी त्यांची सटकली आणि आमदार बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केली.दरम्यान, संतोष बांगर यांनी आपल्यावरील हे आरोप फेटाळून लावलेले आहेत. सीसीटीव्ही चेक करुन सत्य शोधू शकता, अशी भूमिका संतोष बांगर बोलून दाखवली.