मुंबई :  एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आता महाराष्ट्राबाहेर (Maharashtra) धक्का द्यायला सुरुवात केलीय. 8 राज्यातल्या प्रदेश प्रमुखांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केलाय. शिवसेना (Shiv Sena) कुणाची या कोर्टातल्या लढाईच्या दृष्टीनं ही मोठी घटना आहे. पाहुयात एक रिपोर्ट. (shiv sena 8 state presidents entire in eknath shinde group big blow to uddhav thackeray)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंचं नेतृत्व झुगारुन 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले, 12 खासदार शिंदेंसोबत आहेत, शेकडो नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. हजारो पदाधिकारी,शिवसैनिक शिंदे गटात आले. आता हे कमी होतं म्हणून की काय राज्याबाहेरचेही शिवसेना पदाधिकारी आता शिंदेंच्या गटात दाखल होत आहेत. 8 राज्यांच्या शिवसेना प्रदेशप्रमुखांनी शिंदे गटाला पाठिंबा दिलाय. 


या राज्यांचे प्रदेशप्रमुख शिंदे गटात


दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मणिपूर, मध्यप्रदेश आणि गोव्यातील प्रदेशप्रमुख शिंदे गटात आले आहेत.  या 8 राज्यांच्या प्रदेशप्रमुखांनी शिंदे गटाच्या बैठकीला हजेरी लावली. एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलंय. निवडणूक आयोगासमोर खरी शिवसेना कुणाची याचा वाद सुरू आहे. 


शिंदे गटानं शिवसेनेचं निवडणूक चिन्हं धनुष्यबाणावर दावा केलाय. त्यात 8 राज्यातल्या प्रदेशप्रमुखांनी शिंदेंचं नेतृत्व स्वीकारल्यामुळे शिंदे गटाला न्यायालयीन लढाईसाठी मोठा बुस्ट मिळाला असून ठाकरे गटाचं मात्र टेंशन वाढलंय.