मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनाला खिंडार पडलं. या बंडामुळे शिवसेनेला सत्तेून पायऊतार व्हावं लागलं. शिवसेनेचे (Shivsena) 30 पेक्षा अधिक आमदार हे शिंदेच्या गोटात गेले. त्यानंतर आता ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेतील अनेक नगरसेवकही शिंदे गटात सामील झाले. या सर्व बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एक्शन मोडवर आले आहेत. (shiv sena aditya Thackeray will take out a nishatha yatra starting from tomorrow 8 july meets shiv sainiks)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरे यांनी या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरे हे बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात दौरा करणार आहेत. 


आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा


आदित्य ठाकरे याचवेळी मुंबईतल्या शिवसेना शाखांमध्ये शिवसेना नेते,  युवासेना अध्यक्ष, आमदार, पदाधिकारी , कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत "निष्ठा यात्रा" काढणार आहेत. या निष्ठा यात्रेला उद्यापासून (8 जुलै) सुरुवात होणार आहे.


निष्ठा यात्रेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मुंबईतल्या 236 शाखांमध्ये जाऊन गटप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत . सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कडवट शिवसैनिकांनी शिवसेनेबद्दल दाखवलेली आत्मीयतेबद्दल संवाद करत "निष्ठा यात्रा" सुरु होणार आहे .


शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या राज्यातील 50 बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे "निष्ठा यात्रे" दरम्यान दौरा करणार आहेत. या मतदार संघांमधील शिवसेनेशी एकनिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देऊन शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे.