मुंबई : कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरुन वातावरण पेटलं आहे. कंगना राणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. यानंतर कंगनावर सर्व माध्यमांतून टीकेचा भडिमार सुरु आहे. कंगनाच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना दिंडोशी विधानसभा क्षेत्राच्यावतीने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणाऱ्या आणि मुंबईची बदनामी करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतच्या विरोधात आंदोलन करुन निषेध करण्यात आला. तसंच कंगनाचा निषेध करत फोटोला जोडे मारण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे, शिवसेना भवनासमोरही कंगनाचा पुतळा जाळला आला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वात वरळी नाका येथे कंगना विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हातात काळे झेंडे घेऊन कंगणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 


'कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा'


 



मुंबईची स्थिती ही पाकव्याप्त काश्मीरसारखी POK झाल्याचं वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने केलं होतं. काही दिवसांपूर्वी कंगना राणौतने मला मुव्ही माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची अधिक भीती वाटत असल्याचं म्हटलं होतं. यावरुन संजय राऊत यांनी कंगनाला फटकारलं होते. मुंबई पोलिसांविषयी विश्वास नसेल, इतर राज्यातील पोलिसांची सुरक्षा हवी असेल तर तुम्ही आपल्या राज्यात निघून जावं, असे संजय राऊत यांनी म्हटलं होतं.


काय वाकडं करायचंय ते करा; कंगनाचं शिवसेनाला जाहीर आव्हान


'मुस्लिमांचे वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूडमध्ये मी मराठ्यांचा इतिहास दाखवणारा चित्रपट बनवला'