मुंबई : शिवसेनेने मुंबई मेट्रो - तीन विरोधात आज मुंबईत जोरदार आंदोलन केले. गिरगाव भागात ठाकूरद्वार इथे मेट्रो ३ आणि डी. बी. रियालिटीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या अवडज वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. शाळेच्या बस उशीरा पोहोचतात, अनेक दुचाकींचे अपघात होतात. स्थानिकांचे हाल होत आहेत, असे सांगत शिवसैनिकांनी मेट्रो विरोधात आंदोलन केले. त्यानंतर इथे कामासाठी आलेल्या डंपरच्या काचाही फोडल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेट्रोच्या कामाबाबत स्थानिक रहिवाश्यांना प्रचंड त्रास आणि गैरसोय होत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार करूनदेखील त्याची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे आज शिवसेनेने आंदोलन केले. यावेळी शिवसेनेने आक्रमकपणा दाखवताना डंपरची तोडफोड केली.